आईच वात्सल्य शब्दात सांगणे अशक्यच परंतु एक कृतज्ञतेचा भाव म्हणून मातृदिनाच्या निमित्ताने ही कविता लिहीत आहे.
हरिणीपरी व्याकुळ । गायीहुन प्रेमळ ।
सागराची अथांगता । आकाशाची विशालता ।
स्वप्नांचा डोंगर । प्रकाशाचे वलय ।
वज्राहून कठीण । ममतेचा सागर ।
सुख कुठेय ? सुख, आनंद, हर्ष शोधण्यात खर्चलं आयुष्य अन मनातल्या आशेनेच पेललं जीवनाचं शिवधनुष्य आज मी आलोय दूर कुठेतरी, अखंड चालत ह्या काळोखात. स्वतःलाच हरवून, हातचं राखून. समोरचा अंधार, वाढतच जातोय पावलागणिक. पण त्या पलीकडे मिळेल मला सुख, म्हणून मी तग धरतोय. एक, दोन, तीन, असे अनेक दरवाजे ओलांडून, अनेक शिखरे पायांखाली तुडवून, सह्स्पर्धकांना केव्हाचाच हरवून, कदाचित एकटाच उरलोय. ऐहिक जीवनात गुरफटून, नवीन स्वप्ने मनात बाळगून, नवे ध्येय नवा ध्यास घेऊन, हा रस्ता तुडवतोय. थकवणारी पायपीट त्यागून, सुटाबुटाचा थाट मिरवून, मनास माझ्या अगदी चिरडून, आनंदाचा स्रोत शोधतोय. येणाऱ्या प्रत्येक दरवाज्याचा रंग वेगळा, ढंग वेगळा, अन् उघडण्याचा प्रसंग वेगळा. हरएकाला ओलांडताना मी, माझा अहंकार, माज वाढतच जातोय. आणि सुख कुठेय ? हा सवाल मात्र चित्त भेदून तरीही उरतोय. - मानस


अप्रतिम ! खूपच सुंदर !
ReplyDelete🙏🙏🙏😊😊😊😊
ReplyDeleteAwssome... Amazing..🙌🙌💞
ReplyDelete