ए कदा आजूबाजूच्या जगात उघड्या डोळ्याने पहा आणि मग तुम्हालाही जाणवेल मला पडलेला ए क सवाल बघा काही उत्तर मिळतंय का याच करुणेला आज असा का तरसतो हा बाळ आहे, आभाळाने मातीशी या आज तोडली नाळ आहे. समाज सारा दूषित वाटतो विचार थोडे गचाळ आहे, सद्विचार नाही आवडत कोणा भाषण नुसते रटाळ आहे. तेही निघतात बेईमान गळ्यात ज्यांच्या माळ आहे, चूक म्हणता सापडेल कशी मुख्य कर्ता काळ आहे. आवाजाला आवाज निघतो आता ना कोणी मवाळ आहे, या सगळ्याला उत्तर काय न सुटलेला सवाल आहे. - मानस