Skip to main content

Posts

आजचं आकाश !!! | Ajach Akash | Marathi Story

आजचं आकाश !!!
Recent posts

Marathi Poem (Where is the happiness) | मराठी कविता (सुख कुठेय ?)

सुख कुठेय ? सुख, आनंद, हर्ष शोधण्यात खर्चलं आयुष्य  अन मनातल्या आशेनेच पेललं जीवनाचं शिवधनुष्य  आज मी आलोय दूर कुठेतरी, अखंड चालत ह्या काळोखात. स्वतःलाच हरवून, हातचं राखून.  समोरचा अंधार, वाढतच जातोय पावलागणिक. पण त्या पलीकडे मिळेल मला सुख,  म्हणून मी तग धरतोय.  एक, दोन, तीन, असे अनेक दरवाजे ओलांडून, अनेक शिखरे पायांखाली तुडवून, सह्स्पर्धकांना केव्हाचाच हरवून, कदाचित एकटाच उरलोय.  ऐहिक जीवनात गुरफटून, नवीन स्वप्ने मनात बाळगून, नवे ध्येय नवा ध्यास घेऊन, हा रस्ता तुडवतोय. थकवणारी पायपीट त्यागून, सुटाबुटाचा थाट मिरवून, मनास माझ्या अगदी चिरडून, आनंदाचा स्रोत शोधतोय. येणाऱ्या प्रत्येक दरवाज्याचा रंग वेगळा, ढंग वेगळा, अन् उघडण्याचा प्रसंग वेगळा. हरएकाला ओलांडताना मी, माझा अहंकार, माज वाढतच जातोय.  आणि सुख कुठेय ? हा सवाल मात्र  चित्त भेदून तरीही उरतोय.  - मानस 

Mothers Day | Marathi poetry | मराठी कविता (Marathi Poem) | माय माझी |

आईच वात्सल्य शब्दात सांगणे अशक्यच परंतु एक कृतज्ञतेचा भाव म्हणून मातृदिनाच्या निमित्ताने ही कविता लिहीत आहे.  माय माझी  हरिणीपरी व्याकुळ । गायीहुन प्रेमळ । वात्सल्य तुझे मजवर । अपरिमित ।। सागराची अथांगता । आकाशाची विशालता । तुझ्या मायेची भूल । अपरिमित ।। स्वप्नांचा डोंगर । प्रकाशाचे वलय । गुण गाईन तुझे । अपरिमित ।। सूर्याहून प्रखर । चंद्राहून शीतल । तुझ्या कुशीतला स्वर्ग । अपरिमित ।। वज्राहून कठीण । ममतेचा सागर । लाखांत एक तूची । माय माझी ।। - मानस 

मराठी कविता (Marathi Poem) | गावाकडचा थाट

उ न्हाळ्याचा सुट्ट्या आणि मामाच गाव अनुभवलेल्या सगळ्यांसाठी ...  गावाकडचा थाट  ते संध्याकाळी लाईट जाणे   अंधारात ओरडणे  ते पाढे आणि उजळणी  आ जीची रम्य कहाणी                              . . .  हरवले कुठेतरी  ते टायर घेऊन पळणे  मुक्त शीळ वाजवणे  ते मातीमध्ये खेळणे  घामामध्ये न्हाऊन निघणे                             . . .  हरवले कुठेतरी  खेळ तो सापशिडी चा  पाट आखलेला चंगस चा  सूर्य तो दुपारचा  वारा गार सायंकाळचा                               . . .  हरवला कुठेतरी  ती पोस्टाची तार  आकाशातील घार  ते तिथी आणि वार  वडाखालचा पार                ...

marathi kavita (मराठी कविता) | Savaal (सवाल)

ए कदा आजूबाजूच्या जगात उघड्या डोळ्याने पहा  आणि मग  तुम्हालाही जाणवेल  मला पडलेला  ए क    सवाल    बघा काही उत्तर मिळतंय का याच  करुणेला आज असा का  तरसतो हा बाळ आहे, आभाळाने मातीशी या  आज तोडली नाळ आहे.  समाज सारा दूषित वाटतो  विचार थोडे गचाळ आहे, सद्विचार नाही आवडत कोणा  भाषण नुसते रटाळ आहे.  तेही निघतात बेईमान  गळ्यात ज्यांच्या माळ आहे, चूक म्हणता सापडेल कशी  मुख्य कर्ता काळ आहे.   आवाजाला आवाज निघतो  आता ना कोणी मवाळ आहे, या सगळ्याला उत्तर काय  न सुटलेला सवाल आहे.  - मानस 

अमर होशील तू | मराठी कविता (Marathi Poem)

आ ज पर्यंत आपण बघितलंय एका सैनिकाच्या आईला ते फक्त आपल्या मुलाची वाट पाहतांना , त्याच्या विरहात अश्रू ढळतांना. पण ही झाली नाण्याची एक बाजू,. ज्या घट्ट हृदयाने ती माउली तिच्या लेकराला रणांगणावर पाठवते, ते सामान्य बुद्धीस समजणे म्हणजे अशक्यच.  तरीही तिच्या मनातील या गुप्त भावना मांडण्याचा हा नाजूक आणि तेवढाच भावुक प्रयत्न. हि कविता म्हणजे  लढाईला उभा असणारा एक वीरपुत्र आणि त्याला साद घालणारी त्याला धीर देणारी ही मायेची प्रेमाची पण कर्तव्याची जाणीव करून देणारी चिठ्ठीच  ....  माफ कर हं बाळा, आज अचानक तुझी आठवण झाली. आणि या पत्राने माझं लक्ष वेधलं. कदाचित फोन वर सुद्धा बोलू शकले असते, पण ते धाडस नाही करत मन. बघ जरा, सांभाळ, वेळ खूप बिकट आहे, शत्रू ठाकलेत सीमेवर. तुझे मित्र, बंधू लढताहेत जन्ममृत्यूशी. त्या विचारानेच माझं हृदय धडधडतंय, आणि मनात कालवाकालव होतेय. पण हो तू नको विसरूस, जन्मभूमी ही जननीपेक्षा श्रेष्ठ आहे. तू फिरू नकोस मागे, हटू नकोस कर्तव्यास, काढून टाक विचार मनातून, माझा किंवा तुझ्या प्रियेचाही. आमचं काय आहे ? दोन दिवस अश्...

Rafu | रफू | Marathi Kavita

म नुष्याच्या आयुष्यात असे बऱ्याच वेळेस होते की तो त्याचा स्वाभिमान गाववून बसतो. त्याच्या मनात एक प्रकारचा न्युनगंड येतो, आणि मग तो त्याचा आत्मविश्वास देखील गमावतो. त्याच्या पदरी पडते ती फक्त अवहेलना. तो असह्य होतो आणि स्वतःच्या मनाला सावरून त्याला रफू करुन, सज्ज होतो पुन्हा तोच अपमान आणि पुन्हा तेच जगणे झेलण्यासाठी. यावरच एक भाष्य म्हणजे ही कविता ...... रफू  झाकलेले वस्त्रात मखमली  तेच जगणे खरकटे, त्याच जखमा पुन्हा पुन्हा  तेच भाग्य कळकटे. ओशाळ असले जीवन जरी  चेहऱ्यावरती हसु खोटे, वाट तुडवतो अनवाणी  तोच चिख्खल तेच काटे, गमावून बसला स्वाभिमान  अन विचार सारे उलटे, असूनी उभा घोळक्यात तो  चित्त तरी हे कसे एकटे. ढासळली स्वप्ने सारी  काय रडे अन काय हसे, रफू करुनि काळजाला प्रश्न तोच तो उभा असे. -  मानस