आजचं आकाश !!!
"हो रे माझ्या बाळा, छान आहे हा इंद्रधनुष्य, एकदम मोठ्ठ ! तू मोठा झालास कि विमानात बस आणि मग जवळून बघ हं ? इंद्रधनुष्याला आणि त्या मऊमऊ ढगांनासुद्धा" आईने चिंटूला दुजोरा दिला.
४-५ वर्षांचा चिंटू मित्रांसोबत खेळण्यात अगदी दंग होऊन जाई आणि आकाशाकडे बघणे हा तर या लहानग्या चिंटूचा आवडता विरंगुळा होता.
असाच एक दिवस चिंटू मस्तपैकी मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळता खेळता चेंडू आणण्यासाठी म्हणून तो रस्त्यावर गेला आणि भरधाव येणाऱ्या कारने त्याला भेदरवुन टाकलं. आणि काही उमजण्याच्या आतच गाडीच्या हेडलाईट ला धडकला गेला. चिंटू बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटल मध्ये दाखल झाला. शुद्धीत आल्यावर त्याने आईला हाक मारली "आई मी कुठेय ?" "आपण आपल्या घरीच आहोत "आईने त्याची समजूत काढली.
आज बऱ्याच दिवसांनी चिंटू त्याच्या घरी जाणार होता, त्याच्या डोळ्यांवरही पट्टी आज निघणार होती. तो परत आधीसारखा बघू शकणार होता. चिंटूला आईने आपल्या मांडीवर डोकं ठेऊन शांत पडून होता. डॉक्टरांनी पट्टी काढली आणि म्हणाले, " चिंटू बाळ सावकाश डोळे उघड बघू. " चिंटू ने त्याचे डोळे उघडले आणि आश्चर्याने त्याने आईला आवाज दिला सगळ्या चांदण्या कुठे जाऊन लपल्या ? किती अंधार आहे आकाशात ? तू बघितलं का ग आई ? आजच आकाश !!!
- मानस सोनवणे
Real Emotional Touch 💞
ReplyDelete