गुंता
नात्यांमधे तयार होणारे आणि आपल्याला न कळणारे बरेचसे मतभेद, दुरावे आपल्याच लोकांना आपल्यापासून कसे दूर करतात याचे उदाहरण म्हणजे ही कविता.
नकळत माझ्या बऱ्याचवेळा
मी ज्यात गुंतत जातो
इच्छा नसतांना देखील
गुंता कसलासा पडत जातो ...
कधी असतो साधासा
सहजपणे सुटत जातो
निशान मात्र स्वतःचे
कुठेतरी उमटवत जातो ...
प्रेमाचा, मैत्रीचा, नात्यांचा
मोठा मोठा होत जातो
अचानक मग जीवलग धागा
अजानपणे तुटत जातो ...
- मानस
Bhari
ReplyDeleteThank you
DeleteWah.....😇😇😇😇
ReplyDeleteThank you 😆
DeleteBhari....👌
ReplyDeleteThanks
DeleteI wish ha gunta sodvnyachi shakti bappa tula devo
ReplyDeleteNakkich
DeleteThank you dii
जय हो !!!
ReplyDelete😊😊
Delete